
नवी दिल्ली : देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस दसरा आणि दिवाळीपूर्वी पुन्हा रुळावर धावणार असून याबाबतची माहिती आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) दिली आहे. दरम्यान, तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. पण कोरोनाच्या संकटामुळे 22 मार्चपासून या ट्रेन रुळावरच उभ्या आहेत. पण, आता आयआरसीटीसीमार्फत चालवण्यात येणाऱ्या ट्रेन 17 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहेत.
17 ऑक्टोबरपासून धावणार तेजस एक्स्प्रेस; 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार तिकीट बुकिंग
दरम्यान 8 ऑक्टोबरपासून तेजस एक्स्प्रेसचे तिकीट बुकिंग सुरु होणार असून या ट्रेनच्या सीटचे बुकिंग आयआरसीटीसीकडून (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) सुरू करण्यात येणार आहे. तसेच, प्रवासादरम्यान प्रवाशांना ट्रेनमध्ये पॅक करुन जेवण मिळणार आहे. आयआरसीटीसी आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
