राष्ट्रवादी काँग्रेस ठरला LGBT सेल सुरू करणारा पहिलाच पक्ष


मुंबई – गेल्या काही दशकांपासून पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत व विरोधी अशा दोन्ही भूमिकांमध्ये सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी एक परिवर्तनवादी निर्णय घेतला असून पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेस एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा पहिलाच पक्ष ठरला आहे.

विविध समुदायासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सेल आहेत. आता परिवर्तनवादी व क्रांतिकारी निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. एलजीबीटी सेल सुरू करण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा नवीन सेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादीने हा सेल एलजीबीटी समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज (५ ऑक्टोबर) दुपारी १२.३० वा. या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.