वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे वेलदोडा

वजन वाढणे ही जगभरातील कोट्यवधी नागरिकांची समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी खूप प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यात काही घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरत असल्याचा अनुभव येतो आहे. वेलदोडा किंवा इलायची या मसाल्याला क्वीन ऑफ स्पायसेस असे सार्थ नाव आहे. काळा मिरा किंग ऑफ स्पायसेस म्हणून ओळखला जातो. भारतीय घरात वेलदोडा हमखास असतो. प्राचीन काळापासून वेलदोडा मुखशुद्धी साठी भारतात सेवन केला जात आहे. त्यात वेलदोडा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो आहे.

संशोधनात असे दिसून आले आहे की, हिरवा वेलदोडा चयापचय वाढवितो आणि पचनक्रिया सुधारल्याने पोट साफ होते. परिणामी शरीरावर सूज असल्यास कमी होते. वेलदोडा सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते त्यामुळेही वजन कमी होण्यास चालना मिळते.

वेलदोडा वरचा आणि खालचा रक्तदाब पातळी प्रमाणात राखण्यास मदतगार आहे. चहात घालून वेलदोडा पोटात गेला तर त्याचा प्रभाव अधिक जाणवतो. वेलदोड्याची पूड नियमाने घेतली तर पोटाची चरबी कमी होते.

पोटात गॅस धरणे, शरीरात पाणी साठणे यामुळे वजन वाढते. त्यासाठी वेलदोडा उपयोगी पडतो. वेलदोडे दाणे कुटून त्याची पूड करावी, दुध अथवा खाण्याच्या पदार्थात घालून ती खाल्ली तर शरीराची सूज कमी होते, गॅसेस कमी होतात. जेवणानंतर एक वेलदोडा खाल्ला तर पचन चांगले होऊन पोटाचे आरोग्य सुधारते. पोट साफ होते. छोटा वेलदोडा पाण्यात घालून ते पाणी उकळावे आणि ते पाणी प्यावे त्यानेही पचन सुधारते.

वेलदोड्याच्या दाण्यातून तेल निघते. हे तेल पोटाच्या आतील आवरणाला मजबूत बनविते. पित्तामुळे पोटात तयार होणारे अॅसिड हे वेलदोडा तेल कमी करते. पचन सुधारले की वजन आपोआप नियंत्रणात येऊ लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही