भाजप नेत्याची मुक्ताफळे; चांगले संस्कार नसल्यामुळेच मुलींवर बलात्कार होतो


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुलींवर चांगले संस्कार नसल्यामुळेच बलात्कार होत असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. रामराज्य उत्तर प्रदेशात असल्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचे कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यांनी हे वक्तव्य त्यावेळी केले आहे. आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणे हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात, असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.