सावधान! फोनमधील माहिती चोरत आहेत हे 17 अ‍ॅप्स, गुगलने घातली बंदी

युजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगल वारंवार प्ले स्टोरवरील मॅलिशियस अ‍ॅप्सला हटवत असते. आता दिग्गज टेक कंपनीने 17 आणखी धोकादायक अ‍ॅप्सला आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. हे 17 अ‍ॅप्स जोकर मॅलवेअरने प्रभावित होते. या जोकर मॅलवेअरला  Zscaler ThrearLabZ रिसर्चरने शोधले आहे.

कंपनीच्या रिसर्चर टीमने सांगितले की, त्यांना 17 वेगवेगळे अ‍ॅप्स आढळले, ज्यात धोकादायक मॅलवेअर होते. या अ‍ॅप्सला जवळपास 1 लाख 20 हजार वेळा डाउनलोड करण्यात आले होते. हे मेजेसिंग, फोटो एडिटर आणि स्कॅनिंग अ‍ॅप्स होते. कंपनीने सांगितले की या स्पायवेअरला मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोनची माहिती चोरी करण्यासाठी डिझाईन करण्यात आले होते. हे मॅलवेअर चोरून युजर्सला प्रिमियम वायरलेस अ‍ॅप्लिकेशन प्रोटोकॉल WAP सर्व्हिससाठी साइन-अप करायला लावते.

या अ‍ॅप्सला गुगलच्या टीमने त्वरित हटवले आहे. यामध्ये All Good PDF Scanner, Mint Leaf Message-Your Private Message, Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons, Tangram App Lock, Direct Messenger, Private SMS, One Sentence Translator – Multifunctional Translator, Style Photo Collage, Meticulous Scanner, Desire Translate, Talent Photo Editor – Blur focus, Care Message, Part Message, Paper Doc Scanner, Blue Scanner, Hummingbird PDF Converter – Photo to PDF आणि All Good PDF Scanner या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

जर तुमच्या फोनमध्ये देखील या पैकी कोणताही अ‍ॅप असल्यास त्वरित डिलीट करा. अन्यथा तुमची खाजगी माहिती चोरी होऊ शकते.