‘नमस्ते’सह लाँच झालेले अ‍ॅपलचे भारतातील पहिले ऑनलाईन स्टोर, या आहेत ऑफर्स


भारतात वाढते ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण पाहता दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलने अखेर भारतातील आपले पहिले ऑनलाईन स्टोर आज लाँच केले आहे. अ‍ॅपलच्या ऑनलाईन स्टोरची वेबसाईट https://www.apple.com/in/shop आहे. आता ग्राहक अ‍ॅपलचे उत्पादन फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनच्या ऐवजी थेट अ‍ॅपलच्या स्टोरवरून खरेदी करू शकतील.

अ‍ॅपलच्या ऑनलाईन स्टोरवर ग्राहक जुन्या फोनला एक्सचेंज करून नवीन फोन देखील खरेदी करू शकतात. ऑनलाईन स्टोरवर एक्सचेंज करता येणाऱ्या फोनची यादी देखील देण्यात आली आहे. समजा तुम्ही आयफोन एक्सएस मॅक्सला एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला या फोनची एक्सचेंज वॅल्यू जवळपास 35 हजार रुपयांपर्यंत मिळेल. अ‍ॅपल स्टोरवरून खरेदी केलेल्या कोणत्याही प्रोडक्टची डिलिव्हरी 72 तासांच्या आत होईल.

या स्टोरवरून कंपनीचे आयफोन, आयपॅड, अ‍ॅपल वॉच, मॅकूबक आणि अ‍ॅपल टिव्ही सारखे प्रोडक्ट खरेदी करता येतील. या प्रोडक्ट्सची डिलिव्हरी कॉन्टॅक्टलेस असेल. पेमेंटसाठी सर्व पर्याय असतील.

अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करण्यासोबत तज्ञ तुम्हाला त्या वस्तूची संपुर्ण माहिती देखील देतील. याशिवाय हिंदी आणि इंग्रजी भाषेत कस्टमर केअरची सुविधा मिळेल. अ‍ॅपलच्या प्रोडक्ट्ससोबत अ‍ॅपलकेअर+ सुविधा देखील घेऊ शकता. याद्वारे कोणत्याही वस्तूवरील वॉरंटी 2 वर्षांपर्यंत वाढेल.