‘महाराष्ट्रावर ‘राजकीय तांडव’ करण्याचे बक्षीस मिळाले’, निवृत्त गुप्तेश्वर पांडेंवर संजय राऊत यांचे टीकास्त्र


बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती निवृत्ती घेतली आहे. एनडीएच्या तिकिटावर ते बिहारमध्ये निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. आता निवृत्तीनंतर त्यांच्यावर राजकीय टीका सुरू झाली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पांडे यांच्यावर निशाणा साधत त्यांना ‘इनाम’ मिळाल्याचे म्हटले आहे.

गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, जो पक्ष त्यांना उमेदवारी देईल लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रावरील त्यांच्या राजकीय तांडवमागील अजेंडा स्पष्ट झाला आहे. ते मुंबई प्रकरणात आपल्या वक्तव्यांनी राजकीय अजेंडा चालवत होते व आता त्याचेच इनाम घेण्यासाठी जात आहेत.

दरम्यान, गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, सुशांत प्रकरणात त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यांना एकप्रकारे पॉलिटिकल अजेंडा बनवले जात होते. निवडणुकीत त्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले असते, म्हणून निवृत्ती घेतली. राजकारणात जाणार का ? असा प्रश्न विचारला असता पांडे म्हणाले की, राजकारणात जाणे वाईट नाही. मात्र अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.