भारत अमेरिकेकडून खरेदी करणार हे खास ड्रोन्स, चीनवर ठेवता येणार लक्ष


चीनसोबतच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपली संरक्षण शस्त्र खरेदी वाढवत आहे. वेपन्स सिस्टमपासून ते क्षेपणास्त्र टेक्नोलॉजीपर्यंत भारतातच विकसित करण्यास प्राथमिकता दिली जात आहे. आता संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून 30 जनरल एटॉमिक्स एम क्यू – 9 रीपर ड्रोन खरेदी करण्याची शक्यता आहे. हा करार जवळपास 22 हजार कोटी रुपयांचा असेल. डील दोन टप्प्यात होणार असून पुढील काही महिन्यात 6 ड्रोन्स भारताला मिळतील. त्यानंतर 3 वर्षात इतर 24 ड्रोन्सची डिलिव्हरी होईल.

Image Credited – Aajtak

अमेरिकेकडून 30 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर ठेवला जाईल. याचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आहेत. भारत मागील 3 वर्षांपासून हे ड्रोन्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या ड्रोनमध्ये हेलफायर किंवा हवेतून जमिनीवर मारा करता येतील अशी क्षेपणास्त्र असतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Image Credited – Aajtak

या ड्रोन्सची वैशिष्ट्ये –

  • ड्रोन तयार करणारी कंपनी जनरल एटॉमिक्सचा दावा आहे की, हे ड्रोन 27 तासांपेक्षा अधिक वेळ हवेत उडू शकते.
  • एमक्यू-9 रीपर ड्रोनचा टॉप-स्पीड ताशी 444.5 किमी आहे.
  • हे ड्रोन 50 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण घेऊ शकते.
  • एकसोबत 12 मूव्हिंग टार्गेट्सला ट्रॅक करू शकते.
  • एकूण 1746 किलो वजन उचलण्यास सक्षम असून, ड्रोनवर 1361 किलो वजन लादता येते.
  • यात फॉल्ट टॉलरेंट फ्लाइट कंट्रोल सिस्टम आहे.
  • ट्रिपल रिडन्‍डेंट एवियॉनिक्‍स सिस्‍टम आर्किटेक्‍चर आहे.
  • इलेक्‍ट्रो-ऑप्टिकल इन्‍फ्रारेड (EO/IR), सर्व्हिलान्स रडार, मल्‍टी-मोड मॅरिटाम सर्व्हिलान्स रडार, लिंक्‍स मल्‍टी-मोड रडार, इलेक्‍ट्रॉनिक सपोर्ट मेजर्स (ESM), लेजर डेसिग्‍नेटर्सशिवाय अनेक शस्त्र पॅकेज घेऊन जाण्यास सक्षम आहे.
  • एजीएम-114 हेलफायर क्षेपणास्त्र आणि लेजर गाइडेड बॉम्ब घेऊन जाऊ शकतो.
  • एक क्षेपणास्त्र सोडल्यानंतर केवळ 0.32 सेंकदात दुसरे क्षेपणास्त्र सोडता येते.
  • धोका आपोआप ओळखण्यास सक्षम.
  • सिंथेटिक अपर्चर रडार, व्हिडीओ कॅमेरा आणि फॉरवर्ड लूकिंग इन्फ्रारेडने सुसज्ज आहे.
  • जगभरात कोठेही रिअल टाईम डेटा पाठवण्यास सक्षम.