मदन शर्मांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणात  शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले होते.

मदन शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असे म्हटले होते. सोबतच आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मदन शर्मा यांची भेट घेतली असून, त्यांना वाय+ सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

आज रामदास आठवले यांनी मदन शर्मा यांची घरी जाऊन भेट घेतली. यानंतर ट्विट करत रामदास आठवलेंनी माहिती दिली की, आज मदन शर्मा यांच्या घरी जाऊन भेट घेतली. केंद्र सरकारकडून त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.