भेटा ‘छोट्या रफी’ला, आनंद महिंद्रांनी देखील दिली याच्या गाण्याला दाद


सोशल मीडियावर सध्या एका युवकाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या मागचे कारण ही खास आहे. कारण हा तरुण अगदी मोहम्मद रफी यांच्याप्रमाणे गाणे गातो. जुडीश राज नावाच्या ट्विटर युजरने या तरुणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये तरूण चिराग या चित्रपटातील ‘तेरे आंखो के सिवा’ हे गाणे गात आहे. ट्विटर युजरनुसार या तरुणाचे नाव सौरव किशन असून, तो केरळच्या कोझिकोड येथे राहणार आहे. त्याला ‘छोटा रफी’ या नावाने ओळखले जाते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, आतापर्यंत 11 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

ट्विटर युजर जुडीश राजनुसार सौरव अगदी 10 वर्षांचा असल्यापासून रफी साहेबांची गाणी गात आहे. नेटकरी सौरवचे गाण्यावर एवढे आवडले की, ते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रांना देखील त्याचा आवाज खूपच आवडला.

सौरवचा युट्यूब चॅनेल देखील असून, त्यावर जवळपास 5 हजार स्बस्क्राईब्स आहेत. या छोट्या रफीच्या गाण्याला प्रत्येकजण दाद देत आहे.