असे तपासा पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेच्या यादीतील तुमचे नाव


पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) ही मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात 2022 पर्यंत जास्तीत जास्त कुटुंबाना पक्के घर उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत घराची निर्मितीसाठी सरकारकडून मदत केली जाते. ज्या कुटुंबाकडे घर नाही अथवा ग्रामीण भागात आपले पक्के घर बांधू इच्छित आहेत, ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Image Credited – news18

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेत 6 लाखांपर्यंतचे कर्ज वर्षाला 6.5 टक्के व्याज दराने उपलब्ध होते. घराचा आकार कमीत कमी सर्व मुलभूत सुविधा जसे की वीज, किचन यासह 25 वर्ग मीटर असावी. या योजनेंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसीडी दिली जाते. जर तुम्हाला घरासाठी अधिक कर्ज हवे असल्यास तुम्ही सर्वसाधारण दराने व्याज भरून कर्ज घेऊ शकता. समजा, तुमचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे आणि तुम्ही 6 लाखांचे कर्ज घेतले असल्यास तुम्हाला 6.5 टक्के सबसीडी मिळे. या सबसीडीमुळे तुमचे कर्ज कमी होऊन 3.33 लाख रुपये होते.

Image Credited – news18

गरीबी रेषेच्या खाली असलेल्या (बीपीएल) नागरिकांना व अन्य काही जणांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील आहेत. यामध्ये तुमचे संपुर्ण देशात कोठेही पक्के घर नसावे. यासाठी आर्थिकरित्या मागास (ईडब्ल्यूएस), एलआयजी (निम्न उत्पन्न गट) किंवा बीपीएल (गरीबी रेषेखालील) श्रेणीतून असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये असणे गरजेचे आहे.  या योजनेंतर्गत लाभधारकांची यादी ही सामाजिक आर्थिक जात जनगणना 2011 वर लक्ष देऊन तयार केली जाते. याशिवाय अंतिम यादी तयार करण्यासाठी तहसील आणि पंचायतीचा देखील समावेश केला जातो.

Image Credited – news18

अर्ज केले असल्यास असे तपासा नाव –

अर्ज केला असल्यास नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx वेबसाईटवर जा. रजिस्ट्रेशन नंबर असल्यास तो टाकावा. यानंतर माहिती समोर येईल. रजिस्ट्रेशन नसल्यास  ‘एडवांस सर्च’ वर क्लिक करा. समोर आलेला फॉर्म भरा व यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव तपासा.

ही कागदपत्रे असणे आवश्यक –

योजनेसाठी अर्ज केलेला फॉर्म, आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्तपन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा, 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आयकर परतावा, फॉर्म 16, टॅक्स असेसमेंट ऑर्डर, व्यवसाय असेल तर त्यासंबंधी कागदपत्र, याशिवाय याआधी कोणतेही पक्के घर नाही यासाठी एक शपथपत्र देणे आवश्यक आहे. तसेच, बिल्डलर दिलेल्या पैशांची पावती, झालेला करार व सोसायटीचे एनओसी आवश्यक आहे.