कोरोना व्हायरसवरून चीनवर वारंवार आरोप होत आलेले आहे. या व्हायरसला चीनच्या वुहान लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचा दावा देखील अनेकदा केला जातो. आता चीनच्याच प्रसिद्ध वायरोलॉजिस्टने व्हायरस मनुष्याने बनवल्याचे पुरावे आपण देणार असल्याचा दावा केला आहे. हाँगकाँग स्कूलच्या वायरोलॉजिस्ट नडॉ. ली मेंग यांन यांनी दावा केला आहे की कोरोना व्हायरस महामारी पसरण्यास सुरुवात होण्याआधीच बिजिंगला याबाबत माहिती होती. हा दावा केल्यानंतर आपले प्राण वाचवण्यासाठी त्या अमेरिकेत राहत आहेत.
वुहान लॅबमध्ये झाली कोरोना व्हायरसची उत्पत्ती, चीनच्या वैज्ञानिकाकडे पुरावा
एका चॅट शो मध्ये बोलताना वायरोलॉजिस्टने दावा केला की चीनी सरकारने डेटाबेसमधून ही सर्व माहिती हटवली आहे. वुहानच्या बाजारातून व्हायरस पसरला ही खाली दिखावेगिरी आहे. त्यांनी दावा केला की लवकरच एक अहवाल प्रकाशित करणार असून, ज्यात व्हायरसला मनुष्याने बनवले असल्याचे पुरावे असतील. डॉ. यान हे आपले प्राण वाचण्यासाठी अमेरिकेला गेल्या आहेत.
डॉ. यान म्हणाल्या की, वुहानच्या मांस मार्केटला केवळ पडदा म्हणून वापरले जात आहे. हा नैसर्गिक व्हायरस नाही. हा व्हायरस लॅबमधून आला आहे. त्यांचा दावा आहे की, त्या कोरोना व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत.