कंगणाकडून करण जोहरचा खळबळजनक उल्लेख; म्हणाली चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी


आता निर्माता करण जोहरवर मूव्ही माफियाचा मुख्य आरोपी असल्याचा उल्लेख अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे. आपल्या ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कंगनाने एक ट्विट केले आहे. ज्यात तिने, करण जोहर हा चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी असून अनेक लोकांचे जीवन उद्धवस्त करुन तो खुलेआम फिरत आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही काही अपेक्षा करु शकतो का? सगळे प्रकरण शांत झाल्यानंतर तो आणि त्याची गँग माझ्याकडेही येईल, असे म्हटले आहे.

कंगनाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाहीवर वारंवार टीका केली आहे. याधीही अनेकदा करण जोहरवर तिने टीका केली आहे. त्याचबरोबर करण जोहरला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची तिने मागणी केली होती. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणाली होती की, भारत सरकारला करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मी विनंती करते. मला त्याने उघडपणे धमकावले आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर त्याने मला इंडस्ट्री सोडण्यास सांगितले. सुशांतची कारकीर्द खराब करण्याची षडयंत्र रचले. उरी लढाई दरम्यान त्याने पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला आणि आता त्याने आमच्या सैन्याविरूद्ध एक एंटीनॅशनल चित्रपट बनवला आहे. करण जोहरची गँग माझ्याविरोधात षडयंत्र करत असल्याचे देखील कंगनाने म्हटले होते. कंगनाने आधीदेखील करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. करण जोहर फक्त स्टार किड्सला प्रोत्साहन देत त्यांना चित्रपटात काम देत असल्याचे तिने म्हटले होते.