लफडेबाज आयपीएस नवऱ्याची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार


लखनऊ – उत्तर प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले असून तक्रार पत्नी स्वतः देखील अधिकारी असून ती सध्या दिल्लीत कार्यरत आहे. आपल्या नवऱ्यावर आरोप करत त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असून तो फोनवर महिलांशी अश्लिल बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या महिला अधिकाऱ्याने केली आहे.

यासंदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने ४ पानी पत्र लिहिले आहे. तिने या पत्रासोबतच पतीच्या महिलांसोबत अश्लील संभाषणाचे ५० पेक्षा जास्त चर्चेचे स्क्रिनशॉट्स पाठवले आहेत. त्याचबरोबर आयपीएस संभाषणाचा व्हिडिओही महिलेने पेन ड्राईव्हमध्ये अमित शहा यांना पाठविला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि डीजीपी यांनाही या पत्राची एक प्रत पाठविली आहे.

लखनऊचा या महिलेचा नवरा रहिवासी असून २००९ बॅचचा तो आयपीएस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिकाऱ्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की, २०१४ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. तिचा नवरा लग्नानंतर झांसी, एटा, अयोध्या आणि मेरठ अशा अनेक शहरांमध्ये कार्यरत होता आणि येथेच त्याने वेगवेगळ्या महिलांशी संबंध निर्माण केले असा पत्नीचा आरोप आहे.

आपल्या पतीसोबत मध्य प्रदेशच्या सीमेवरील एका जिल्ह्यातील १८ वर्षीय तरुणीचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. हा आय.पी.एस.अधिकारी ज्यावेळी त्याच जिल्ह्यात कार्यरत होता. त्यावेळी मुलगी आपल्या आईवडिलांसोबत एका केसच्या निमित्ताने पोलीस अधिक्षक कार्यालयात आली होती. त्या दरम्यान, या दोघांची ओळख झाली. हळूहळू त्यांचे संबंध वाढत गेले. आयपीएस पतीची ही चूक महिलेने अनेक वेळा पकडली, पण त्याने कुटुंबासमोर आपली चूक मान्य करून लेखी माफी मागितली. सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर तिचा नवरा आहे आणि तपास एजन्सीच्या मुख्यालयात महत्वाच्या हुद्यावर कार्यरत आहे.

याठिकाणी आयपीएस पतीने एका घटस्फोटीत महिलेशी अनैतिक संबंध ठेवले असून त्या महिलेला लग्नाच्या बहाण्याने आपल्यासोबत ठेवले असल्यामुळे पतीच्या वागणुकीला कंटाळून पत्नीने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:च्या पतीवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.