टाइम्सच्या ‘Most Desirable Women’ च्या यादीत दिशा पटनीने मारली बाजी


केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या सौंदर्य आणि फिटनेसबाबत अभिनेत्री दिशा पटनीची सोशल मीडियात कायम चर्चा होत असते. अतिशय अल्पावधीत तिने आपला वेगळा असा चाहतावर्ग बनवला आहे. दरम्यान 2016 मध्ये आलेल्या एमएस धोनी अनटोल्ड स्टोर या चित्रपटाद्वारे दिशाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने अवघ्या चार वर्षात लोकप्रियता मिळवली. आता तरी तिने दीपिका पादुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सारख्या दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत, टाइम्स Most Desirable Women 2019चे जेतेपद जिंकले आहे. तिने या यादीत अव्वल स्थान काबीज केले आहे.

ई-टाईम्सशी बोलताना याबाबत दिशा म्हणाली, चाहत्यांकडून मला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी नेहमीच कृतज्ञ आहे. ही एक सुंदर भावना तसेच मजेदार आहे. पण अद्यापही मी पूर्वीसारखी एक टॉम बॉय आहे. दिशानंतर या यादीमध्ये सुमन राव, कॅटरिना कैफ, दीपिका पादुकोण, वर्तिका सिंह, कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, यामी गौतम, आदिती राव हैदरी, जॅकलिन फर्नांडिस, शिवानी जाधव, आलिया भट्ट, तारा सुतारिया, गायत्री भारद्वाज, कृती सनन यांची नावे समाविष्ट आहेत. तर या यादीमध्ये छोट्या पडद्यावरील हिना खान, जेनिफर विंगेज, एरिका फर्नांडिस, मौनी रॉय यांना स्थान मिळाले आहे. या सर्वेक्षणात सेलिब्रिटींच्या लुक, आत्मविश्वास, प्रतिभा आणि शैलीनुसार त्यांना स्थान देण्यात आले आहे.

टाइम्स Most Desirable Women 2019 च्या यादीतील काही नवीन

  • शिवानी जाधव (Femina Miss Grand India 2019)
  • तारा सुतारिया, शेफाली सूद (Miss Diva Supranational 2019)
  • समंथा अक्केनी (Hyderabad Times Most Desirable Woman 2019)
  • शांवी श्रीवास्तव (Bangalore Times Most Desirable Woman of 2019)
  • श्रेया शंकर (Femina Miss India United Continents 2019)
  • नुसरत जहां (Calcutta Times Most Desirable Woman of 2019)
  • तापसी पन्नू, अनन्या पांडे, भूमि पेडणेकर, साई मांजरेकर आणि नेहा पेंडसे (Maharashtra’s Most Desirable Woman for 2019)

दरम्यान, दिशा पटनी काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मलंग’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त अनिल कपूर, कुणाल खेमू आणि आदित्य रॉय कपूर यांच्या देखील मुख्य भूमिका होत्या. दिशा आता सलमान खानच्या आगामी ‘राधेः तुम्हारा मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटात दिसणार आहे. याआधी दिशाने सलमानबरोबर भारत चित्रपटात काम केले होते.