IPL; नव्या अवतारात मैदानात उतरणार मुंबई इंडियन्स


आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाची नवी जर्सी रिलीज करण्यात आली. ही जर्सी सर्वांसमोर हटके व्हिडिओ शेअर करत सादर करण्यात आली असून या व्हिडिओत नवीन MI जर्सी घालून पाण्याखाली डान्स करत असलेला हायड्रोमॅन पाहायला मिळत आहे. या हायड्रोमॅनने मुंबई इंडियन्सच्या थीम सॉन्गवर ताल धरला आहे. निळ्या आणि सोनेरी रंगात ही जर्सी पाहायला मिळत आहे.

दरम्यान तुम्ही देखील मुंबई इंडियन्सची ही नवी जर्सी https://bit.ly/2DalFTL या साईटवरुन प्री-ऑर्डर करु शकता. गतवर्षीची आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर यंदाच्या वर्षी देखील मुंबई इंडियन्सने आयपीएल विजेतेपद जिंकावे, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 या चार आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा 2020 ची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचाही मानस आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघामध्ये हार्दिक पांड्या, जसप्रित बुमराह, पोलार्ड आणि मल्लिंगा यांसारखे लोकप्रिय खेळाडू आहेत. 19 सप्टेंबरपासून UAE मध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे.