शेतकऱ्याच्या देसी जुगाडावर आनंद महिंद्रा फिदा; शेअर केला व्हिडिओ


आपल्या देशात टॅलेंट भरभरुन आहे, हे काही आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. पण अशा टॅलेंटचा उपयोग काय ज्याला म्हणावे तसे प्रोत्साहन मिळत नाही, त्याचबरोबर त्या कौशल्याला आपली वेगळी ओळख निर्माण करता येत नाही. असे कौशल्य कधीच प्रकाशझोतात येत नसल्याचे म्हटले, तर चुकीचे ठरणार नाही. आपण आम्ही आज असे का सांगत आहोत, त्यामागे कारण देखील तसेच आहे.

सध्या सोशल मीडियावर एका शेतकऱ्याच्या अनोख्या देसी जुगाडाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारे आनंद महिंद्रा देखील थक्क झाले आहेत. वाळलेल्या मक्याच्या कणसाचे दाणे काढण्यासाठी एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याच्या त्याच टॅलेंटचे आनंद महिंद्रांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

दरम्यान, दोन व्यक्ती दुचाकीच्या टायरच्या साहाय्याने मक्याचे दाणे आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काढत आहे. आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, माझ्याकडे सतत नाविन्यपूर्ण व्हिडिओ क्लिप येत असतात. या व्हिडिओमध्ये शेतकरी गाडी आणि ट्रॅक्टरमध्ये काहीतरी कल्पक गोष्ट करत असतात. पण, दुचाकीचा अशा प्रकारचा वापर होऊ शकतो, असा विचार मी स्वप्नात देखील केला नसल्याचे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकी डबल स्टँडवर लावण्यात आली असून यात गाडीच मागचे चाक जसे फिरत आहे, तसे मक्याचे दाणे खाली ठेवलेल्या कापडावर पडत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरस होत आहे. अनेकांनी या शेतकऱ्याच्या टॅलेंटला सलाम केला आहे.