अमेरिकन सरकार यापुढे शी जिनपिंग यांना मानणार नाही चीनचे ‘राष्ट्राध्यक्ष’


वाशिंग्टन – कोरोनामुळे चीन आणि अमेरिकेत पडलेली वादाची ठिणगी आता भयाण रुप घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच अमेरिकेने चीन कंपनीच्या टीक-टॉकवर बंदी घातल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सोबत वारंवार खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर आता लवकरच अमेरिका सरकारच्या कुठल्याही दस्तावेजमध्ये शत्रु अधिनियम अंतर्गत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा राष्ट्राध्यतक्ष असा नामोल्लेख नसणार आहे. त्यामुळे आता अमेरिका सरकार शी जिनपिंग यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष मानणार नाही.

संघीय सरकारद्वारे चीनच्या प्रमुख नेत्याचा उल्लेख करण्याच्या प्रकारात बदलण्याचे विधेयक वॉशिंग्टनमधील संसदेत मांडले आहे. त्यानुसार, राष्ट्राध्यक्ष या शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे. चीनच्या प्रमुख नेत्याला राष्ट्राध्यक्ष न संबोधण्याचे या विधेयकात म्हटले आहे. चीनी कम्युनिष्ट पक्षात भूमिकेनुसार चीनच्या प्रमुख नेत्याचा संदर्भ दिला पाहिजे. सद्यस्थितीत चीनचे प्रमुख नेते शी जिनपिंग यांच्यासाठी 3 अधिकारिक पदांचा उल्लेख होतो. त्यामध्ये, कुठेही राष्ट्राध्यक्ष असे पद किंवा उल्लेख नाही.

प्रमुख नेते, केंद्रीय सैन्य आयोगाचे अध्यक्ष आणि कम्युनिष्ट पक्षाचे महासचिव असा जिनपिंग यांचा संदर्भ आहे. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह इतरही इंग्रजी बोलणाऱ्या देशांचे प्रमुख त्यांचा उल्लेख राष्ट्राध्यक्ष असाच करतात. त्यामुळे, जनतेतून निवडूण येणाऱ्या नेत्यासच राष्ट्राध्यक्ष म्हटले जावे, राष्ट्राध्यक्ष शब्दाचा अर्थच जनतेतून निवडूण आलेल्या नेत्यांसाठी केला जातो, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. एका प्रमुख नेत्यास राष्ट्राध्यक्ष संबोधणे म्हणजे निवडूण येणाऱ्या नेत्यांस अनुचित वैधता असल्याचे दर्शवते, असेही त्यांना वाटते.