प्रकाश जावडेकरांनी जारी केली मालिका, चित्रपटांच्या शूटिंगसाठी नवीन नियमावली


नवी दिल्ली – मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची (एसओपी) माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी घोषणा केली. या एसओपीमध्ये चित्रपट निर्मिती करताना शूटिंगच्या दरम्यान काय-काय काळजी घ्यावी लागेल, त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असून या एसओपी मागे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हा उद्देश आहे.

आता चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगचे काम सुरु करता येईल. इंडस्ट्रीतील लोकांना यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. त्याचरोबर मास्क परिधान करावे लागेल. शूटिंग करताना फक्त जे दोन लोक कॅमेऱ्यासमोर आहेत. त्यांना यातून सूट देण्यात आली आहे. सेटवरील कलाकार आणि कर्मचाऱ्यांसाठी एसओपीमुळे सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी मदत होईल. या एसओपीमध्ये स्वच्छता, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा उपकरणांचाही समावेश आहे.