बहिणीनेच उघडे पाडले डोनाल्ड ट्रम्प यांचे पितळ


वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची थोरली बहिण मॅरीन ट्रम्प बॅरी यांनीच ट्रम्प यांचे पितळ उघडे पाडले असून त्यांच्यावर त्यांनी अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे. शनिवारी मॅरीन ट्रम्प बॅरी यांचे गुप्तपणे करण्यात आलेले ऑ़डिओ रेकॉर्डिंग समोर आले. मॅरीन ट्रम्प बॅरी यांनी या रेकॉर्डिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. मॅरीन ट्रम्प बॅरी या ऑडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना कुठलेही तत्व नसून ते क्रूर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भाची मेरी ट्रम्पने मॅरीन यांचे बोलणे त्यांच्या माहितीशिवाय रेकॉर्ड केले होते. अलीकडेच मेरी ट्रम्प यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. २०१८ आणि २०१९ मध्ये हे ऑडिओ रेकॉर्डींग केले होते असे मेरी ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये फॉक्स न्यूजला दिलेली मुलाखत पाहिली. ते त्यात म्हणतात की, मला आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्या अप्रवासी मुलांच्या सुनावणीसाठी सीमेवर तैनात करणार, असे मॅरीन ट्रम्प बॅरी यांनी एका रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे. मॅरीन ट्रम्प बॅरी या माजी न्यायाधीश असून या संदर्भातील वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे.

जर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती असता आणि तुम्हाला खरोखर लोकांची मदत करायची इच्छा असती तर तुम्ही असे म्हणाला नसता. ट्रम्प सपशेल खोट बोलत असल्याचे त्यांची बहिणच म्हणते. अप्रवासी मुद्यावर माझे विचारच डोनाल्ड ट्रम्प यांनी कधी समजून घेतले नाही, असे मॅरीन ट्रम्प बॅरी यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे दिवंगत बंधु रॉबर्ट ट्रम्प यांच्या श्रद्धांजली सभेनंतर हे रेकॉर्डिंग समोर आले आहे. एका टप्प्यावर भाची बरोबर बोलताना मॅरीन ट्रम्प बॅरी यांनी ड्रोनाल्ड क्रूर असल्याचे म्हटले आहे.