अखेर डॉक्टरांची कबुली! सुशांतचे पोस्टमार्टम मुंबई पोलिसांमुळेच घाईघाईत केले


मुंबई – आता एक नवा खुलासा सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी झाला असून सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काही त्रूटी आढळल्या आहेत. सुशांतचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी या पार्श्वभूमीवर मोठा खुलासा केला आहे. लवकरात लवकर पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यास मुंबई पोलिसांनी सांगितल्यामुळे हा रिपोर्ट देण्यात घाई झाली, अशी कबुली पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांनी दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयच्या पथकाने सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर काही प्रश्न उपस्थित केले. सीबीआय टीमने पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांच्या पथकाला सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यात ऐवढी घाई का केली? असा प्रश्न केला. यावर थेटपणे मुंबई पोलिसांचे डॉक्टरांच्या टीमने नाव घेतले. लवकरात लवकर रिपोर्ट देण्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. आम्ही रात्री उशीरा सुशांतचे पोस्टमार्टम मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरूनच केल्याचे डॉक्टरांनी सीबीआयला सांगितले.

सुशांतचे पोस्टमार्टम कोरोना रिपोर्ट येण्याआधीच का केले? यावर डॉक्टरांना समाधानकारक उत्तर देता न आल्याचेही सूत्रांनी सांगितले. 14 जूनला सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेला आढळला होता. यानंतर त्याच रात्री सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये सुशांतच्या गळ्यावर 33 सेंमी लांब लिगेचर मार्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य भाषेत लिगेचर मार्क म्हणजे, खोल खूण. सुशांतची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्याच्या तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. पण मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब लिगेचर मार्क होते. हनुवटीच्या खाली 8 सेंमीवर फासाची खूण होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.