इंस्टाग्राम पाठोपाठ आता हिंदुस्तानी भाऊचे फेसबुक पेज देखील सस्पेंड

सोशल मीडियावर द्वेष पसरवणे आणि भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या बॉस 13 चा स्पर्धक आणि युट्यूबर हिंदुस्तानी भाऊच्या अडचणी वाढताना दिसत आहे. नुकतेच इंस्टाग्रामने कम्यूनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्यामुळे त्याचे अकाउंट सस्पेंड केले होते. आता त्याचे फेसबुकवरील व्हेरिफाइड पेज देखील सस्पेंड करण्यात आले आहे.

हिंदुस्तानी भाऊच्या व्हिडीओमध्ये अनेकदा शिव्या, भडकाऊ भाषेचा वापर केला जातो. एकता कपूरच्या विरोधात आक्षेपार्ह्य भाषा वापरल्याने तो चर्चेत आला होता. त्याच्या भडकाऊ व्हिडीओमुळे कॉमेडियन कुणाल कामरासह कुब्रा सैत, फराह अली खान, कविता कौशिक अशा अनेक कलाकारांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

कॉमेडियन कुणाल कामराने देखील महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिंदुस्तानी भाऊच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. कुणाल कामराने हिंदुस्तानी भाऊ द्वेष पसरवरत असल्याचे म्हटले होते. अनेकांनी त्याच्या अटकेची देखील मागणी केली होती.

हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये देखील स्पर्धक म्हणून देखील सहभागी झाला होता.