लोकांच्या पाठीवरून चालला चीनी राजदूत, ‘संस्कृती’च्या नावाखाली चीनने केला बचाव

जगातील अनेक देश कोरोना व्हायरस आणि साम्राज्यवाद धोरणामुळे चीनवर नाराज आहे. आता पुन्हा एकदा चीनने असे काही केले आहे की ज्यामुळे टीकेची झोड उठली आहे. प्रशांत महासागरातील लहानसे बेट किरिबाती येथे चीनचे राजदूत लोकांच्या पाठीवरून चालत असल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जगभरातून चीनी राजदूताच्या कृत्यावर टीका होत आहे.

किरिबाती येथे चीनचे राजदूत तांग सोनग्गेन यांच्या स्वागतासाठी लोकांनी स्वतःच झोपून रेड कार्पेट तयार केले. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत असून, अमेरिकेच्या वरिष्ठ राजदूताने सभ्य समाजात अशा प्रकारचा व्यवहार स्विकार केला जाणार आहे. अमेरिकेची ही टीका चीनला चांगली झोंबली असून, चीनने देखील याला प्रत्त्युतर दिले आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, त्यांचे राजदूत पारंपारिक स्वागत समारोहात सहभागी झाले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन म्हणाले की, किरिबातीमधील स्थानिक सरकार आणि तेथे लोकांच्या विनंतीवर राजदूत स्थानिक संस्कृती आणि पंरपरेचे पालन करण्यासाठी लोकांच्या पाठीवर चालले. काही लोक या घटनेद्वारे किरिबाती आणि चीनचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.