भारतात कोरोनाविरुद्धच्या लढाईला वेग, एका दिवसात तब्बल 10 लाख चाचण्या

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. भारताने आता महामारीच्या लढाईचा वेग वाढवला आहे. भारतात दररोज हजारो रुग्ण आढळण्या मागचे कारण अधिक टेस्टिंग देखील आहे. आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, मागील 24 तासात तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक लोकांची टेस्टिंग केली आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांचा बरे होण्याचा दर शुक्रवारी 74 टक्क्यांवर गेला आहे. एका दिवसात 62,282 रुग्ण बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. आतापर्यंत भारतात 21.5 लाख कोरोनारुग्ण बरे झाले आहेत. कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा दर देखील कमी होऊन 1.89 टक्के झाला आहे.

मंत्रालयाने सांगतिले की, 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात बरे होण्याचा दर 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सध्या भारतात जवळपास 7 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरनुसार देशात आतापर्यंत 3 कोटी 44 लाखांपेक्षा अधिक चाचण्या केलेल्या आहेत. देशभरात जवळपास 1500 लॅबला चाचणी करण्यास परवानही आहे.