कोरोनाचा असाही परिणाम, फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी ‘नमस्कार’ करत केले जर्मनीच्या काउंसिलरचे स्वागत

कोरोना व्हायरस महामारीने जगण्याची पद्धत पुर्णपणे बदलली आहे. आता लोक एकमेकांना भेटल्यावर हात मिळवण्याऐवजी भारतीय संस्कृतीप्रमाणे नमस्कार करत आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही अनेक राष्ट्राध्यक्ष भारतीय संस्कृतीप्रमाणे एकमेकांना नमस्कार करत आहेत. असाच एक व्हिडीओ फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांना भेटल्यावर नमस्कार करतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी मॅक्रॉन यांनी त्यांचे नमस्कार करत स्वागत केले. याचा व्हिडीओ स्वतः मॅक्रॉन यांनी स्वतः ट्विटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मर्केल हात मिळवण्याऐवजी नमस्कार करत आहेत. यानंतर मर्केल देखील नमस्कार करतात.

कोरोना संकटामुळे नमस्कार करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूसह अनेक नेते नमस्कार करण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देत आहेत.