ठरलेल्या तारखेलाच होणार NEET आणि JEE च्या परीक्षा, सरकारने केले स्पष्ट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सप्टेंबरमध्ये पार पडणाऱ्या मेडिकलची प्रवेश परीक्षा नीट आणि इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईईची तारीख पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत आहे. सोशल मीडियावर देखील या मागणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच ठरलेल्या तारखेलाच या दोन्ही परीक्षा होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

अधिकाऱ्यांनुसार, परीक्षेच्या तारखेंबाबत संपुर्ण विचार करून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता तारखा पुढे ढकलल्या जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या ज्या शंका होत्या त्या आधीच दूर करण्यात आलेल्या आहेत. कोव्हिडच्या काळात सुरक्षितरित्या परीक्षा घेण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे.

1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणारी जेईई (मेन) परीक्षा 8,58,273 विद्यार्थी देणार आहेत. 99.07 टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार परीक्षेचे सेंटर देण्यात आले आहे. याआधी 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली होती. न्यायालयाने म्हटले होते की, देशातील देशात सर्व काही थांबवावे का? असे महत्त्वाचे वर्ष का वाया घालवायचे?

दुसरीकडे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सरकार तारीख पुढे ढकलू शकते. मात्र आता सरकारने ठरलेल्या तारखेलाच परीक्षा होणार असल्याचे म्हटले आहे.