यावर्षी गणपतीसोबतच होईल महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन – रामदास आठवले


मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही आणि यावर्षी गणपतीसोबतच या सरकारचे विसर्जन होईल, असे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी आठवले बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आठवले यांनी स्वागत केले. या प्रकरणाच्या तळाशी सीबीआय जाईल आणि या प्रकरणातील सत्य शोधून काढेल, असेही आठवले यावेळी म्हणाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेतला. अनेक जणांचे जबाब नोंदवूनही मुंबई पोलिसांच्या तपासात विशेष असे काही निष्पन्न न झाल्यामुळे सीबीआयकडे हा तपास द्यावा अशी मागणी संपूर्ण देशातून मागणी होऊ लागली, असेही रामदास आठवले यांनी यावेळी म्हटले आहे.

आठवले पुढे बोलताना म्हणाले की, एकूण प्रकरणाचा तपास आणि परिस्थिती पाहता असे वाटत आहे की, महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत आहेत किंवा कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात जे लोक सहभागी आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,असेही रामदास आठवले या वेळी म्हणाले.

संपूर्ण जगात मुंबई पोलीसांची प्रतिमा ही अव्वल क्रमांकाची आहे. अशा पद्धतीने मुंबई पोलिसांची प्रतिमा घराब होणे हे योग्य नाही. अशा प्रकारची अनेक प्रकरणे मुंबई पोलिसांनी हाताळली आहेत. काही प्रकरणात तर मुंबई पोलिसांनी एवढी चांगली कामगिरी केली आहे की, आरोपींनी कोणत्याही प्रकारचा पुरावच मागे ठेवला नव्हता. तरीही पोलिसांनी गुन्हेगारांचा माग काढला.

नवभारत टाइम्स ऑनलाईन सोबत बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, 105 आमदार भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्याशिवाय त्यांना 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. आणखी 30 आमदारांची आम्हाला आवश्यकता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच आमच्यासोबत येतील. आता शिवसेनेला निश्चित करायचे आहे की, भाजपसोबत यायचे आहे की, आणखी काय करायचे आहे. शिवसेनेला आमच्याकडून नेहमीच आमंत्रण आहे. सोबत येऊ सरकारस्थापन करु. जनतेने दिलेल्या आदेशाचे पालन करु. त्यासाठी संसदेच्या अधिवेशन काळात शिवसेना नेत्यासोबत चर्चा करु असे, आठवले यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश