देशातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख ६८ हजारांच्या पार


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजनूच गडद होत आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ५३ हजार ६०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे.

२२ लाख ६८ हजार ६७६ कोरोनाबाधितांच्या आकड्यात ६ लाख ३९ हजार ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण, तर कोरोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित १५ लाख ८३ हजार ४९० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार २५७ जणांचा समावेश असल्याचे वृत्त एएनआयने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. देशात आता अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण २८.२१ टक्के, कोरोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित अशांचे प्रमाण ६९.८० टक्के व मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे. एएनआयने ही माहिती केंद्र सरकारच्या हवाल्याने दिली आहे.