सलग फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही एवढ्या कोटींची मालकीण आहे रिया


अभिनेत्री रिया चक्रवर्ती हे नाव आता आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे झाले असेल, ही तिच रिया चक्रवर्ती आहे, जो सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात कधीकाळी सुशांतची गर्लफ्रेन्ड राहिलेल्या रियाविरोधात तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्तीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने आजवर हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच चित्रपट केले आहेत. त्यातपण विशेष म्हणजे तिला आजवर एकही हिट चित्रपट देता आलेला नाही, पण तरी देखील ती कोट्यावधी संपत्तीची मालकीण आहे.

रियाचे वडील लष्करात डॉक्टर, तर आई गृहिणी आहे. तिला एक भाऊ असून त्याचे नाव शेविक आहे. सुशांतप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणुकीचा या चौघांवरही आरोप आहे. रिया चक्रवर्ती 2009 मध्ये एमटीव्हीच्या ‘टीन दीवा’ या रिअ‍ॅलिटी शेमध्ये फर्स्ट रनर अप होती. यानंतर तिने दिल्लीत एमटीव्हीच्या व्हिडीओ जॉकी बनण्यासाठी ऑडिशन दिले आणि ती सिलेक्टही झाली. व्हीजे म्हणून तिने कॉलेज बीट, टीकटॅक सारखे प्रोग्राम होस्ट केले आहेत. टीव्ही प्रोग्राम होस्ट केल्यानंतर रियाला अ‍ॅक्टिंगच्या क्षेत्रात जाण्याची आवड निर्माण झाली.

रिया व्हीजे म्हणून काम करत असताना इंजिनिअरिंग करत होती. पण तिने अ‍ॅक्टिंग करिअरसाठी इंजिनिअरिंग सोडले. 2012 मध्ये तिला पहिला ब्रेक मिळाला. तेलगू चित्रपट ‘तुनीगा तुनीगा’तून तिने पदार्पण केले. पण चित्रपट सूपरडूपर फ्लॉप झाला. रियाने 2013 मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. तिचा ‘मेरे डॅड की मारुती’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. पण तिचा हा चित्रपट देखील फ्लॉप झाला. त्यानंतर तिने 2014मध्ये आलेल्या ‘सोनाली केबल’ चित्रपटात काम केले, मात्र हा चित्रपट देखील दणकून आपटल्यानंतर सलग 3 वर्षे रियाला कुठलेही काम नव्हते. त्यानंतर तिला 2017 मध्ये तिला ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ आणि ‘दोबारा- सी योर इव्हिल’ या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. पण हे चित्रपटही दणकून आपटले. यानंतर आलेल्या ‘बँकचोर’ आणि 2018 मध्ये ‘जलेबी’ या चित्रपटांमध्ये ती मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली, पण हे चित्रपटही फार कमाल दाखवू शकले नाही.

रियाने 2012 ते 2020 या काळात एकूण 8 चित्रपटात काम केले, पण यातील एकही चित्रपट हिट ठरला नाही. पण तिने गेल्या दोन वर्षात भरलेला आयकर बघितला असता, तिचे वार्षिक उत्पन्न 10 ते 14 लाखांच्या आसपास आहे. पण तिची मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे. मुंबईत तिचे दोन फ्लॅट आहेत. सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रियाकडे असलेल्या संपत्तीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रियावर सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटींची फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.