शास्त्रज्ञांमुळेच अडचणीत आली ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधक लस


संपूर्ण जगात कोरोना या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यातच या महामारीचा समूळ नाश करण्यासाठी जगभरातील सर्वच संशोधक प्रयत्न करत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस केव्हा उपलब्ध होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच या कोरोना प्रतिबंधक लसीवरुन दोन शास्त्रज्ञांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. हे दोन्ही शास्त्रज्ञ लसीच्या चाचणी प्रक्रियेवरून एकमेकांशी सहमत नाहीत. ऑक्सफोर्डची कोरोना कोरोना प्रतिबंधक लस शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

यासंदर्भात डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रतिबंधक लसीवरून प्राध्यापक एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यात वाद सुरू आहे. एखाद्या चाचणीसाठी लोकांना मुद्दाम कोरोना संक्रमित करायचे की नाही यावरून प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यात वाद सुरू आहे.

निरोगी स्वयंसेवकांना कोरोना संक्रमित करावे, असे प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल यांनी सांगितले होते. दरम्यान कोरोनाच्या लसीची चाचणी यशस्वी तेव्हाच समजली जाते जेव्हा, लस वापरणारे बहुतेक लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले तरी त्यांना त्याची लागण होणार नाही. एकीकडे ब्रिटनमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, अशा परिस्थितीत चाचणी यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी याआधी ठरवले होते, की काही स्वयंसेवकांना लस दिली जात आहे, ते स्वत: येत्या काळात व्हायरसच्या संपर्कात येऊ शकतात. पण आता प्रोफेसर अ‍ॅड्रियन हिल यांना काही स्वयंसेवकांना कोरोना संक्रमित करून लसीची चाचणी करायची आहे. डेलीमेलच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट या अ‍ॅड्रियन हिल यांच्याशी मताशी सहमत नाहीत.

स्वयंसेवकांना जर शास्त्रज्ञ कोरोनाला संक्रमित करतील तर, लसीच्या चाचणीचे निकाल लवकर येऊ शकतात. पण यावर दोन्ही तज्ज्ञांचे एकमत असेल तेव्हाच चाचणी पूर्ण करता येऊ शकेल, एनएचएसकडून चाचणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळेलही पण या दोन्ही शास्त्रज्ञांनी अधिकृतपणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.