पाकिस्तानला जागतिक बँकेने दिला झटका, भारतासोबतच्या पाणीवाटप वादावर मध्यस्थी करण्यास नकार

जागतिक बँकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला असून, बँकेने भारत-पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीवाटप वादावर मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. जागतिक बँकेने दोन्ही देशांना तटस्थ विशेषज्ञ किंवा न्यायालय मध्यस्तचाची नियुक्ती करावी असे म्हटले आहे. या वादात आम्ही काहीही करू शकत नाही, असे स्पष्टमत बँकेने मांडले आहे.

जागतिक बँकेचे पाकिस्तान प्रकरणांचे माजी संचालक पेटचमुथू इंलगोव्हन म्हणाले की, या वाद मिटविण्यासाठी भारत-पाकिस्तानने मिळून काम केले पाहिजे. पाकिस्तानने जागतिक बँकेला भारतातील दोन जलविद्युत प्रकल्पांबाबत आर्बिट्रेशन कोर्ट (सीओए) नेमण्याची विनंती केली होती.

भारताच्या 3030 मेगावॅट क्षमतेच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्प आणि 850 मेगावॅटच्या रातले जलविद्युत प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप आहे. तर भारतनुसार, आम्ही जागतिक बँकेच्या नियमांनुसार जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी हे प्रकल्प चालवित आहोत.

दरम्यान, 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन्ही देशांत पाण्यावरून वाद सुरू आहे. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज नद्यांचा समावेश असलेल्या सिंधू जल प्रणाली भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये वाहते. या नद्यांवर भारताने धरणे बांधून पाण्याचा वापर करत आहे आणि यामुळे त्यांच्या भागात पाणीटंचाईमुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाले असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.