आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजच्या विजेत्यांची घोषणा, हे अ‍ॅप ठरले सर्वोत्कृष्ट

चीनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर सरकारने काही दिवसांपुर्वी आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजची घोषणा केली होती. आता या चॅलेंज्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून, यात शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप चिंगारीने बाजी मारली आहे. चिंगारी अ‍ॅपने बेस्ट व्हिडीओ मेकिंग अ‍ॅपचा खिताब मिळवला आहे. चिंगारीने अनेक लोकप्रिय अ‍ॅपला मागे टाकत बाजी मारली आहे.

चिंगारीला सोशल मीडिया अ‍ॅप कॅटेगरीमध्ये मोठ्या प्रमाणात वोट मिळाले. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे आयोजित अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंजता उद्देश अशा देशी अ‍ॅपची ओळख करणे, ज्याचा युजर वापर करत आहेत व त्यात जागतिक स्तरावरील अ‍ॅप बनण्याची क्षमता आहे.

सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये चिंगारीला मित्रों आणि शेअरचॅट अ‍ॅपने टक्कर दिली. मात्र हे अ‍ॅप शेवटच्या राउंडमध्ये क्वालिफाय करू शकले नाहीत. या चॅलेंजमध्ये हजारो अ‍ॅप्सने भाग घेतला होता.

चिंगारी अ‍ॅपचे सह-संस्थापक सुमित घोष याविषयी म्हणाले की, जे फीचर आम्ही देतो, ते खासकरून युवा भारतीयांसाठी तयार केलेले आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय युजर्सच्या आवडीची नक्कीच काळजी घेऊ.