ठरलं! युजवेंद्र चहल लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केला फोटो

भारतीय क्रिकेटपूट युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. युजवेंद्र चहलने आपल्या भावी जोडीदारासोबत फोटो शेअर करत लिहिले की, कुटुंबाच्या सहमतीने आम्ही एकमेकांना होकार दिला.

चहलने सोशल मीडियावर साखरपुड्याची माहिती दिल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चहलच्या भावी पत्नीचे नाव धनश्री वर्मा असून, धनश्रीने देखील आपल्या इंस्टाग्रामवर चहलसोबतचे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. धनश्री एक डॉक्टर असल्याचे सांगितले जात असून, सोबतच तिचा एक युट्यूब चॅनेल देखील आहे.

लॉकडाऊनदरम्यान चहल आणि धनश्री झूम वर्कशॉप्समध्ये सोबत दिसले होते. धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चहलचे डान्स व्हिडीओ देखील शेअर केलेले आहेत.