आता या कागदपत्रांद्वारे घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड


नवी दिल्ली – ‘वन नेशन वन कार्ड’ धोरण देशात लागू झाल्यानंतर आता रेशन कार्ड हे अत्यंत आवश्यक दस्तावेज बनले आहे. केवळ स्वस्तातील धान्य घेण्यासाठीच नव्हे तर ओखळपत्र म्हणून सुद्धा रेशन कार्डचा वापर होतो. कुठल्याही राज्यातील व्यक्ती ‘वन नेशन वन कार्ड’ धोरणाच्या घोषणेनंतर देशातील कुठल्याही भागात जाऊन स्वस्तात रेशन घेऊ शकतो.

पण तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही आता घरबसल्या आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने ऑनलाइन रेशनकार्डसाठी अप्लाय करून रेशनकार्ड बनवू शकता. सर्व राज्यांनी यासाठी आपापली संकेतस्थळे बनवली आहेत. ज्या राज्यातील तुम्ही रहिवासी आहात त्या राज्याच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.

रेशन कार्ड बनविण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रतेच्या अटी आहेत

  • रेशनकार्ड बनवणारी व्यक्ती ही भारतीय असावी
  • कुठल्याही अन्य राज्याचे रेशन कार्ड त्या व्यक्तीकडे असता कामा नये
  • रेशनकार्ड ज्याच्या नावे बनवायचे आहे त्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे
  • आई-वडिलांच्या रेशनकार्डमध्ये १८ वर्षांखालील मुलांचे नाव हे समाविष्ट करावे
  • एका कुटुंबात रेशनकार्ड कुटुंबप्रमुखाच्या नावे असते
  • रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट असलेल्या व्यक्तीचा कुटुंबप्रमुखाशी जवळचा संबंध असावा
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावाचा त्यापूर्वी अन्य कुठल्याही रेशनकार्डमध्ये समावेश नसावा

घरबसल्या रेशनकार्डसाठी कसा कराल अर्ज?

  • रेशन कार्ड बनवण्यासाठी आपल्या राज्याच्या संकेतस्थळावर सर्वप्रथम जा.
  • त्यानंतर Apply online for ration Card या लिंकवर क्लीक करा
  • आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा वापर रेशन कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून करता येऊ शकेल
  • रेशनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी ५ रुपयांपासून ते ४५ रुपयांपर्यंत शुल्क आहे.
  • अर्ज केल्यानंतर शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा
  • त्यानंतर फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असेल तर तुमचे रेशनकार्ड तयार होईल.

आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, सरकारने जारी केलेले कुठलेही ओळखपत्र तसेच पॅनकार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा म्हणून, वीजबिल, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट पासबूक या कागदपत्रांचा रेशनकार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून वापर करता येऊ शकतो.