तायवानच्या सीमेवर चीनी सैन्य, दोन्ही देशात युद्धजन्यस्थिती

चीनने दक्षिण चायना सागरात तायवानच्या भागावर ताबा मिळविण्यासाठी युद्धाभ्यासाच्या नावावर हजोरा सैनिक तैनात केले आहेत. आता चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी तायवानने जवळपास 200 मरीन कमांडोजची एक कंपनी प्रतास बेटावर पाठवली आहे. चीनचे सैन्य या बेटावर हल्ल्याची योजना बनवत असल्याचे सांगितले जात आहे. चीनमध्ये या बेटाला डोंगसा नावाने ओळखले जाते.

चीनचे सैन्य हैनान बेटावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण अभ्यास करण्याची योजना बनवत होता. ज्यात तायवानच्या नियंत्रणात असलेल्या बेटावर ताबा मिळविण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. चीनच्या या युद्धाभ्यासात मोठ्या प्रमाणात मरीन कमांडो, लँडिंग शिप्स होव्हरक्राफ्ट आणि सैन्य हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे.

प्रतास बेटाला दोन समुद्रकिनारे आणि दोन कोरल रीफ आहेत. हे बेट तायवानच्या दक्षिणी शहर काउशुंगपासून जवळपास 445 किमी आणि चीनच्या मुख्य भूमीपासून 300 किमी अंतरावर स्थित आहे. येथे जास्त लोक देखील राहत नाहीत. आता या भागावर वर्चस्वासाठी दोन्ही देशांनी येथे सैन्य तैनात केले आहे. या तणावाच्या स्थितीमध्ये चीन-तायवानमध्ये युद्धजन्यस्थिती निर्माण झाली आहे.