JEE आणि NEET परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून देखील वाद सुरू आहेत. तर काही महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे. आता जेईई आणि नीट परीक्षा रद्द करावी यासाठी 11 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

जेईई मेन परीक्षा 1-6 सप्टेंबर आणि नीट यूजी-2020 परीक्षा 13 सप्टेंबरला पार पडणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे.

याआधी मानव संसाधन विकास मंत्रालयाने नीट आणि जेईई परीक्षा स्थगित केले होती. मंत्रालयाने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांसाठी नवीन तारखा जारी केल्या होत्या. मात्र आता विद्यार्थी या नवीन तारखांना देखील परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.