मुकेश अंबानीच्या रिलायन्समुळे अॅपलचे जागतिक स्थान धोक्यात


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अब्जावधीची परकीय गुंतवणूक मिळविणाऱ्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीने ‘फ्युचरब्रँड इंडेक्स 2020’च्या यादीत दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. कंपनीला हे यश अशावेळी मिळाले आहे, ज्यावेळी कंपनीचे बाजारमुल्य 14 लाख कोटींवर जाऊन पोहोचले आहे. त्याचबरोबर रिलायन्स कर्जमुक्तही झाली आहे. तसेच 2200 रुपयांवर रिलायन्सचा शेअर पोहचला आहे.

फ्युचरब्रँड इंडेक्स हा जगातील सर्वात मोठे ब्रँडची माहिती देतो. यामुळे केवळ भारताचाच नाही तर जगातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड रिलायन्स बनला आहे. आयफोन बनविणारी अॅपल कंपनी रिलायन्सच्या पुढे आहे. सध्या मुकेश अंबानींच्या रिलायन्मध्ये होत असलेल्या गुंतवणुकीच्या वेगावरून असे दिसते की, रिलायन्स काही महिन्यांतर अॅपललाही मागे टाकून जगातील पहिला सर्वात मोठा ब्रँड म्हणून समोर येणार आहे.

फ्युचरब्रँडने 2020 च्या या यादीमध्ये सर्वात मोठी उडी ही दुसऱ्या नंबरसाठी घेतली गेली आहे. सर्वबाजुंनी रिलायन्स ताकदवर बनत चालली आहे. त्याचबरोबर रिलायन्स ही भारतातील सर्वाधिक नफ्यात असलेली कंपनी आहे. कंपनी नैतिकतेने काम करते. यामुळे लोकांचा कंपनीवर भावनिक विश्वास वाढत चालला असल्याचे फ्युचरब्रँडने म्हटले आहे.

मुकेश अंबानींना रिलायन्सच्या या यशाचे श्रेय दिले जावे. कंपनीला त्यांनी नवीन ओळख दिली आहे. ऊर्जा, पेट्रोलिअम, कापड उद्योग, नैसर्गिक संसाधने, रिटेल आणि दूरसंचारसारख्या क्षेत्रात आज कंपनी काम करत आहे. त्याचबरोबर कंपनीमध्ये गुगल आणि फेसबुकनेही भागीदारी खरेदी केल्याचे या अहवालात फ्युचरब्रँडने म्हटले आहे.

फ्युचरब्रँडच्या या यादीमध्ये अॅपल आणि रिलायन्सनंतर तिसऱ्या क्रमांकावर सॅमसंग आहे. तर चौथ्या क्रमांकावर एनवीडिया, मोताई पाचव्या क्रमांकावर, नाईकी सहाव्या क्रमांकावर, मायक्रोसॉफ्ट सातव्या क्रमांकावर, एएसएमएल आठव्या क्रमांकावर, पेपल नवव्या क्रमांकावर आणि नेटफ्लिक्स दहाव्या क्रमांकावर आहे. मागील सहा वर्षांपासून ही यादी फ्युचरब्रँड जाहीर करत आहे.