आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल – संजय राऊत


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असा जाहीर इशारा दिला आहे. राज्यातील सत्तेवर ठाकरे सरकार विराजमान झाल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असून ते सध्या अस्वस्थ आहेत आणि त्याच वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप केले जात असल्याची टीकाही त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे.

या सगळ्यांशी आदित्य ठाकरे यांचा काय संबंध, राज्यात ठाकरे सरकार आल्यामुळे विरोधी पक्षातील काही जणांच्या पोटात दुखत आहे आणि ते अस्वस्थ आहेत. हे सरकार अजूनपर्यंत ज्यांना रुचलेले नाही ते अशा प्रकारे वैफल्यातून घाणेरडे आरोप करत आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राविरोधात कारस्थान असल्याची शंका मला तर आहे. यामागील सूत्रधार आम्हाला माहिती आहेत. या कारस्थानाची त्या सगळ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असे मी जाहीरपणे सांगतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावर काय म्हणाले होते आदित्य ठाकरे