नवी दिल्ली : येत्या २४ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यांतील राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. राज्यसभेतील उत्तर प्रदेशमधील खासदार बेनीप्रसाद वर्मा तसेच केरळमधील खासदार एम. पी. वीरेंद्रकुमार यांच्या निधनानंतर दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांसाठी आता निवडणूक होणार आहे.
२४ ऑगस्टला राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान
जुलै २०२२ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून बेनीप्रसाद वर्मा हे निवृत्त होणार होते तर एप्रिल २०२२ मध्ये वीरेंद्रकुमार हे निवृत्त होणार होते. ६ ऑगस्ट रोजी निवडणुकीची अधिसूचना काढली जाणार असून मतदान २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल मतदानाच्याच दिवशी सायंकाळी जाहीर केला जाणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.