6000mAh दमदार बॅटरीसह ‘सॅमसंग गॅलेक्सी एम31एस’ स्मार्टफोन भारतात लाँच

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आपला आणखी एक मिडरेंज स्मार्टफोन गॅलेक्सी एम31एस भारतात लाँच केला आहे. हा फोन काही महिन्यांपुर्वी लाँच झालेल्या गॅलेक्सी एम31चे अपग्रेडेट व्हर्जन आहे. सॅमसंग एम सीरिजच्या या फोनमध्ये 6.5 इंच फूल एचडी+ इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यासोबतच यात सॅमसंगचे एक्निनॉज 9611 प्रोसेसर आहे, ज्याची क्लॉक स्पीड 2.3 गीगाहर्टज आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज देखील मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर या फोनमध्ये 4 रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. ज्यातील 64 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आहे. याशिवाय इतर कॅमेरे 12+5+5 मेगापिक्सल असे आहेत. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे. कॅमेऱ्यासोबत नाइट मोड, 4के रेकॉर्डिंग आणि सिंगल शॉट सारखे अनेक फीचर्स मिळतील.

Image Credited – NDTV

सॅमसंगच्या या नवीन स्मार्टफोन 6000 एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. ही बॅटरी 25W फास्ट चार्जर सपोर्टसह येते. अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/A-जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला आहे. फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Image Credited – HT Tech

6 ऑगस्ट पासून सॅमसंग गॅलेक्सी एम31एस ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडिया, सॅमसंग ऑनलाईन स्टोर आणि ठराविक ऑफलाईन स्टोरमध्ये सुरू होईल. फोनच्या 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये आणि 8जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,499 रुपये आहे.