कोणत्याही परीक्षेशिवाय DRDOमध्ये थेट मुलाखतीतून होणार नोकर भरती


नवी दिल्ली – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ) थेट भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेतून ज्युनिअर रिसर्च फेलोच्या (जेआरएफ) पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिकृत नोटिफिकेशननुसार लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार नाही, तर थेट मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या नोकरभरतीसाठी काढलेल्या नोटिफिकेशननुसार ज्युनिअर रिसर्च फेलोच्या चार पदांच्या भरतीसाठी डीआरडीओकडून मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपये स्टायपेंड मिळेल. त्याचबरोबर डीआरडीओच्या नियमांनुसार एचआरएसुद्धा देण्यात येणार आहे.

या नोकर भरतीसाठी २८ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. पण यात आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सुट मिळेल. डीआरडीओच्या https://drdo.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना जावे लागेल. त्यानंतर नोटिफिकेशनप्रमाणे अर्ज भरावा लागेल. नोटिफिकेशनमध्ये मागवण्यात आलेल्या कागदपत्रांसह मुलाखतीसाठी निर्धारित ठिकाणी पोहोचावे लागेल. ६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ज्युनिअर रिसर्च फेलोच्या या चार पदांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.