‘बाहुबली’ दिग्दर्शक एसएस राजामौली यांना कोरोनाची लागण

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील नेतेमंडळी, कलाकारांना देखील कोरोनाग्रस्तांची लागण होत आहे. आता बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विटवर सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मागील काही दिवसांपासून ताप होता. औषध घेतल्यानंतर ताप कमी झाला. मात्र कोरोना चाचणीमध्ये रिपोर्ट पॉजिटिव्ह आला.

राजामौली यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी कुटुंबासह स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. आता कुटुंबातील कोणालाही काहीही लक्षणे नाहीत. मात्र ते सरकारच्या नियमांनुसा काळजी घेत आहेत.

त्यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्य पुर्णपणे बरे होण्याची वाट पाहत आहेत. प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजामौली हे आपली पत्नी रामा राजामौली आणि मुलगी एसएस मखूया सोबत हैदराबाद येथे राहतात.