
नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या संकटकाळात केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) घेतला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ जुलै होती.
आयटीआर दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत केंद्र सरकारकडून वाढ
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने कोरोनाच्या संकटकाळात करदात्यांना दिलासा देण्यासाठी २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ जुलै वरून वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. यासंदर्भातील माहिती आयकर विभागाने दिली आहे. नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात येणारे अडथळे आणि करदात्यांना सुलभपणे नियमांचे पालन करता यावे म्हणून २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवल्याचे आयकर विभागाने ट्विटद्वारे सांगितले. सुरुवातीला रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर ही ती वाढवून ३० जून करण्यात आली होती. त्यानंतर त्याची मुदत वाढवून ३१ जुलै करण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.
