चिंताजनक! भूमिपूजनाआधी राम जन्मभूमीचे पुजारी, 16 पोलीस कोरोना पॉजिटिव्ह

अयोध्यामध्ये येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पडणार आहे. मात्र त्याच्याआधीच चिंताजनक माहिती समोर आली असून, येथील साधू-संतासह सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते प्रधान पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास देखील सत्येंद्र दास यांच्यासोबत राम जन्मभूमीची पूजा करतात.

आता कोरोना पॉजिटिव्ह आल्यानंतर प्रदीप दास यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. राम जन्मभूमीच्या सुरक्षेसाठी असलेले 16 पोलीस कर्मचारी देखील पॉजिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे.

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह देशातील अनेक नेते भूमिपूजनाला उपस्थित राहणार असल्याने जयत्त तयारीसह सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली आहे.