नासा पहिल्यांदाच मंगळ ग्रहावर रोव्हरसोबत पाठवणार हेलिकॉप्टर

मंगळ ग्रहावर जाण्याची अनेक देशांना ओढ लागलेली आहे. 11 दिवसात मंगळ ग्रहाचे तिसरे मिशन पार पडणार असून, आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था मार्स मिशन लाँच करणार आहे. या मिशनची खास गोष्ट म्हणजे यात एक रोव्हर आणि त्या सोबत एक ड्रोन हेलिकॉप्टर आहे. रोव्हर मंगळ ग्रहावर चालेल आणि हेलिकॉप्टर उडून डेटा कलेक्ट करेल. नासाच्या या मिशनचे नाव परसिव्हरेंस मार्स रोव्हर अँड इंजिन्यूटी हेलिकॉप्टर आहे. रोव्हरचे वजन 100 किलो तर हेलिकॉप्टरचे वजन 2 किलो आहे.

Image Credited – Aajtak

मार्स रोव्हर अणू उर्जाद्वारे चालेल. म्हणजेच पहिल्यांदाच रोव्हरमध्ये प्लूटोनियमचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. हे रोव्हर मंगळावर 10 वर्ष काम करेल. यात 7 फूट रोबोटिक आर्म, 23 कॅमेरे आणि एक ड्रिल मशीन आहे. रोव्हर मंगळ ग्रहाचे फोटो, व्हिडीओ आणि नमून घेईल. परसिव्हरेंस मार्स रोव्हर अँड इंजिन्यूटी हेलिकॉप्टर मंगळावर कार्बन डायऑक्साईडद्वारे ऑक्सिजनच्या निर्मितीचे काम करेल. हवामानाचा अभ्यास करेल. जेणेकरून, भविष्यात मंगळावर जाणाऱ्या अंतराळवीरांना याचा फायदा होईल.

Image Credited – Aajtak

रोव्हरमध्ये लागलेले मार्स एनव्हायरमेंटल डायनेमिक्स एनालाइजर हे सांगेल की ग्रहावर मानव राहण्याची स्थिती आहे की नाही. यात तापमान, धूळ, वायूदाब आणि रेडिएशन यांचा अभ्यास केला जाईल. भारतीय वंशाच्या वनीजा रुपाणीने हेलिकॉप्टरला इंजिन्यूटी नाव दिले आहे.

Image Credited – Aajtak

नासाने माहिती दिली की मंगळाच्या हवामानात हे छोटे हेलिकॉप्टर 10 फूट उंच उडत एकावेळी 6 फूट पुढे जाईल. दरम्यान, मागील 10 दिवसात यूएई आणि चीनने देखील मंगळावर मिशन पाठवले आहे.