चिमुकल्यांच्या कल्पकतेला सलाम, पूल गेम खेळण्यासाठी चक्क विटांपासून बनवला टेबल

बालपण हे मजेशीर असते. आजही बालपणीच्या आठवणींनी आपल्या चेहऱ्यावर हसू येते. लहानपणी अनेकांनी वेगवेगळे खेळ खेळले असतील. अशाच काही चिमुकल्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही तुमचे बालपण आठवेल.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लहान मुलांनी विटा जोडून एक पूल गेम बनवला आहे व मन लावून खेळत आहेत. बॉल्सला मारण्यासाठी या मुलांच्या हातात काठी देखील आहे. हा व्हिडीओ पाहून मुले किती क्रिएटिव्ह असू शकतात हे लक्षात येत आहे.

या मजेशीर व्हिडीओला ट्विटर युजर @bhushan_gyan यांनी शेअर केले आहे. मुलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 43 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी या व्हिडीओला पाहिले आहे. अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया देत, मुलांच्या कल्पकतेचे कौतुक केले.