Tata Sky च्या ‘या’ सहा सेवा 50 टक्क्यांनी झाल्या स्वस्त


मुंबई – आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर डीटीएच सेवा पुरवणारी देशातील आघाडीची कंपनी टाटा स्कायने आणली आहे. आपल्या सहा सेवांच्या दरांमध्ये टाटा स्कायने 50 टक्क्यांची कपात केली आहे. ‘डबल धमाका’ असे नाव कंपनीने या ऑफरला दिले असून या ऑफरबाबतची माहिती टाटा स्कायने ट्विटरद्वारे दिली. या ऑफरचा फायदा 26 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत घेता येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या ऑफरअंतर्गत Tata Sky Smart Games आणि Dance Studio चे दर 50 टक्क्यांनी कमी केले आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना डबल ‘जीतोस’ (Zeetos)कमावण्याची संधी असल्याचेही कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. Tata Sky Zeetos हा एक लॉयल्टी प्रोग्राम आहे असून जीतोस पॉइंट्स रीडिम करुन लहान मुलांसाठी रिमोट कंट्रोल इलेक्ट्रॉनिक हेलिकॉप्टर, हॉटव्हील कार्स, बार्बी डॉल अशी खेळणी खरेदी करता येतील.

Tata Sky Smart Games, Fun Learn, Dance Studio, English, Vedic Maths आणि Fitness या सहा सेवांसाठी टाटा स्कायची डबल धमाका ऑफर लागू असणार आहे. ऑफरनुसार, या सहा सेवा दोन ऑगस्टपर्यंत 30 रुपये प्रति महिना दराने उपलब्ध असतील. सामान्यपणे कंपनी या सेवांसाठी प्रति महिना 60 रुपये आकारले जात होते.