आता दर महिन्याला 4 कोटी सर्जिकल मास्क, 20 लाख मेडिकल गॉगल्स निर्यात करणार भारत

केंद्र सरकारने सर्जिकल मास्क आणि मेडिकल गॉल्सच्या निर्यातील कोणत्याही अटीशिवाय मंजूरी दिली आहे. आता भारत प्रत्येक महिन्याला 4 कोटी सर्जिकल मास्क आणि 20 लाख मेडिकल गॉगल्स निर्यात करणार आहे. काही आठवड्यांपुर्वीच सरकारने दर महिन्याला पीपीई किटच्या कव्हरऑलच्या 50 लाख यूनिटच्या निर्यातीला मंजूरी दिली होती.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पीएम मोदींच्या आत्मनिर्भर भारत मंत्राचे अनुसरण करत मेक इन इंडिया आणि भारताच्या औद्योगिक विकासाला प्रमोट करण्यासाठी, सरकारने दर महिन्याला 4 कोटी 2/3 प्लाय असणारे सर्जिकल मास्क आणि 20 लाख मेडिकल गॉगल्सच्या निर्यातीला मंजूरी दिली आहे. याशिवाय फेस शिल्डच्या निर्यातीवर देखील कोणतीही अट नसेल.

यामध्ये मेडिकल गॉगल्स, नॉन मेडिकल/नॉन सर्जिकल मास्क (सुती, सिल्क, पॉलिएस्टर, नायलॉन, रेयॉन, विस्कोस, मिस्क मास्क), नाइट्राइल ग्लव्स फेस शिल्डचा समावेश आहे.