‘पुर्ण सोसायटीचे बिल लावले काय ?’, वीज बिल पाहून भडकला हरभजन सिंग

मागील काही दिवसांपासून वीज बिलाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रेटींना देखील भलेमोठे वीज बिल आले होते. त्यामुळे वीज बिलाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आता भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगला घराचे भलेमोठे वीज बिल आहे. हरभजनने ट्विट करत याची माहिती दिली असून, त्याचे ट्विट व्हायरल होत आहे.

हरभजन सिंगने ट्विट केले की, एवढे बिल काय संपुर्ण सोसायटीचे लावले काय ? सोबतच त्याने अडानी इलेक्ट्रिसिटी मुंबईला देखील टॅग केले.

हरभजनला 33,900 रुपये बिल असून, त्याने लिहिले की, सर्वसाधारण बिलापेक्षा ही रक्कम 7 पट अधिक आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अनेकजण नियमित रक्कमेपेक्षा अधिक बिल आल्याने वैतागले आहेत. अभिनेत्री तापसी पन्नू, हुमा कुरेशी, रेणूका शहाणे अशा अनेक कलाकारांनी भरमसाठ वीज बिल आल्याने ट्विट करत तक्रार केली होती.