मच्छिमाराने पकडला 800 किलोचा भलामोठा दुर्मिळ मासा, एवढ्या लाखांना झाली विक्री

पश्चिम बंगालच्या दिघा येथे एक दुर्मिळ मासा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला आहे. एका प्लाईंग शिपप्रमाणे दिसणाऱ्या या विशाल माशाचे वजन 800 किलो आहे. हा एक दुर्मिळ मासा असून, या भागात आधी कधीच आढळला नाही. या माशाची तब्बल 20 लाख रुपयांना विक्री झाली आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

Image Credited – Aajtak

एका ट्रॉलरच्या मदतीने 780 किलो मासा पकडण्यात आला. या माशाचे नाव चिलशंकर फिश आहे. ज्या ट्रॉलरद्वारे हा काळ्या रंगाचा मासा पकडण्यात आला, त्या ट्रॉलरचा मालक ओडिशाचा आहे. वजन भरपूर असल्याने मासा हलू शकत नव्हता. या भल्यामोठ्या माशाला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Image Credited – Aajtak

या माशाला दोरीने बांधून एक व्हॅनमध्ये ठेवण्यात आले. बाजारात जेव्हा याची बोली लागली, त्यावेळी 2100-2200 रुपये प्रति किलोने विक्री करण्यात आली. या प्रकारे मच्छिमाराला जवळपास 20 लाख रुपये मिळाले. लॉकडाऊनमध्ये या माशामुळे मच्छिमार लखपती झाला आहे.

Image Credited – Aajtak

या माशाच्या तेल आणि हाडांपासून औषध बनते. तर इतर भागाचा जेवणात पदार्थ म्हणून वापर करतात.